Akkalkot Tuljapur Pandharpur Tour Package

स्वामी समर्थ: आगमन, इतिहास आणि कार्य

स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल: इ.स. १८५६-१८७८) हे १९ व्या शतकात जन्मलेले एक दिव्य व्यक्तिमत्व आहेत. श्रीपाद वल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतर भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. “मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे” हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात.


श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूरात निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि शैल यात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले. त्या कर्दळी वनात त्यांनी ३०० वर्षे कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्या शरीरावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली; तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होते.


स्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्रात प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे गावात प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले. त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली आणि लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे.


अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला.


स्वामी समर्थ समाधी:

श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दि. ३० एप्रिल १८७८ रोजी (चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली दुपारी आपला देह ठेवला. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांच्या परम शिष्य चोळप्पा यांच्या इच्छेखातर त्यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. शिष्य चोळाप्पा हे महाराजांच्या समाधीच्या आधीच ७ वर्षे आधीच गेले होते.


अक्कलकोटमधील महत्वाची ठिकाणे:

  • खंडोबा मंदिर: श्री स्वामी समर्थांचे प्रकटस्थळ
  • वटवृक्ष मंदिर: श्री स्वामी समर्थाचे मंदिर
  • समाधी मंदिर: श्री स्वामी समर्थांचे समाधी मंदिर (परम शिष्य चोळप्पा यांचे निवासस्थान)


अक्कलकोटमधील राहण्याची व्यवस्था:

  • अन्नछत्र मंडळ भक्तनिवास
  • खाजगी हॉटेल्स आणि लॉजेस


अन्नछत्र मंडलाकडून रोज मोफत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.


जवळचे आणखी तीर्थस्थळे:

  • गाणगापूर: श्री नरसिंह सरस्वती स्थापित निर्गुण पादुका मंदिर (६२ किमी)
  • तुळजापूर: महाराष्ट्राची आराध्य दैवत तुळजा भवानी मंदिर (६४ किमी)
  • पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (१११ किमी)
  • सोलापूर: सिद्धेश्वर मंदिर (४० किमी)


खास टूर पॅकेजेस

फंडेऑपशन तुमच्या गरजेनुसार अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूर, आणि तुळजापूरसाठी ग्रुप टूर आणि कस्टमाइज्ड टूर पॅकेजेसची प्रदान करते, ज्यामुळे प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव मिळेल. तुम्ही आध्यात्मिक समृद्धी, नैसर्गिक सौंदर्य किंवा साहस शोधत असाल तर आमची पॅकेज तुमच्या गरजा पूर्ण करतात.

  • अखंड प्रवासाचा अनुभव: सुस्थितीत असलेल्या वाहनांमध्ये आरामदायी प्रवास.
  • तज्ञ स्थानिक मार्गदर्शक: आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची अंतर्दृष्टी मिळवा.
  • सानुकूल करण्यायोग्य प्रवास योजना: आपल्या प्राधान्यांनुसार तयार केलेल्या लवचिक योजना.
  • निवास पर्याय: लक्झरी रिसॉर्ट्सपासून बजेट-अनुकूल मुक्कामापर्यंत.

अविस्मरणीय प्रवासासाठी तयार आहात?

📞 आम्हाला कॉल करा: 8766562969 / 9527071838
✉️ आम्हाला ईमेल करा: tulshiram@fundayoption.com
🌐 आम्हाला भेट द्या: www.fundayoption.com


Fore more info about Swami Samarth : Click Here

फंडेऑपशन हॉस्पिटॅलिटीसह चिरस्थायी आठवणी तयार करा. आजच तुमची सुटकेस बुक करा!

Leave a Reply